मुखपृष्ठ ताज्या बातम्या राजकीय राज्य सोलापूर अक्कलकोट शैक्षणिक क्रीडा प्रेरणादायी कृषी पर्यटन वाढदिवस विशेष नोकरी संदर्भ

---Advertisement---

विराट-अनुष्काने मुलीसोबतचा फोटो शेअर करत सांगितलं नाव

On: February 2, 2021 11:41 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई | काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी कन्यारत्नाला जन्म दिला आहे. त्यानंतर विराट-अनुष्काच्या लेकीचं नाव काय असेल, याची सर्वांनाच उत्सुकता होती. दरम्यान, अनुष्का शर्माने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पती आणि मुलीसोबतचा फोटो शेअर करत मुलीचं नाव सांगितलं आहे.

विशेष म्हणजे या बाळाचं नाव ऐकल्यानंतर त्या नावामागचा नेमकं अर्थ काय हा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे. खरं तर हे नाव ऐकल्यानंतर विराट आणि अनुष्का या दोघांचं नाव एकत्रित करुन वामिका हे नाव ठेवले असावे असे चाहत्यांना वाटत होते. मात्र, या नावाचा एक खास अर्थ असून ते ठेवण्यामागे एक कारण आहे.

‘वामिका’ या नावाचा अर्थ ‘दुर्गा’ असा आहे. वामिका हे दुर्गा देवीचं आणखी एक नाव आहे. विराट- अनुष्काच्या घरात एका चिमुकलीने आगमन केल्यामुळे ती देवीचं रुप आहे असं म्हणत त्यांनी या चिमुकलीचं नाव वामिका ठेवले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment