---Advertisement---

….त्यावेळी भाजपच्या एका नेत्यामुळे खूप त्रास झाला – पद्मश्री डॉ. लहाने यांचा गौप्यस्फोट

On: February 3, 2021 11:31 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई – नेत्रतज्ज्ञ व वैद्यकीय शिक्षण संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. डॉ. लहाने यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सरकारने नव्हे तर भाजपाच्या एका मंत्र्यामुळे खूप त्रास झाला, असा गौप्यस्फोट केला आहे.

डॉ. लहाने यांना वंजारवाडी येथे संत वामनभाऊ व भगवानबाबा प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आलेला समाजभूषण पुरस्कार समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी केलेल्या भाषणात डॉ. लहाने म्हणाले, “तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याला कायमच पाठिंबा दिला. वेळोवेळी सहकार्य केले. त्यावेळीही धनंजय मुंडे हेही कायम आपल्या पाठीशी उभे होते. फडणवीस सरकारच्या काळात ‘नेत्रदानाचा महायज्ञ’ ही संकल्पना राबविता आली. त्यावेळी नेत्रतज्ज्ञ म्हणून अनेक उपक्रम राबवता आले.”  मात्र, एका मंत्र्यामुळे आपल्याला फडणवीस सरकारच्या सुरुवातीच्या काळात त्रास झाला होता. “पण फडणवीस सरकारच्या सुरुवातीच्या काळात एका मंत्र्यामुळे मला त्रास झाला होता. पण तेव्हाही देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन माझ्या पाठीशी उभे होते,” असा आणखी एक गौप्यस्फोट तात्याराव लहाने यांनी केला.

दरम्यान तात्याराव लहाने हे गेल्या काही दिवसांपासून भाजपबद्दल किंवा भाजपमधील मंत्र्यांबद्दल गौप्यस्फोट करत आहे. यावर भाजपकडून मात्र अद्याप काहीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!