---Advertisement---

कोकणात शिवसेनेला दणका ; शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश

On: February 3, 2021 4:50 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई | मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश करून २४ तास उलटण्याआधीच ज्येष्ठ नगरसेवक मंदार हळबे यांनी भाजपामध्ये प्रवेश करत मनसेला खिंडार पाडलं.

तर आता कोकणात मनसेने शिवसेनेला दणका दिला आहे. खेड तालुक्यातील मेटे गावातील मधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शाखा अध्यक्ष सह शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश केला आहे.

यामध्ये सेनेचे जिल्हा सरचिटणीस व खेड तालुका उपाध्यक्ष संदिप फडकले यांच्या माध्यमातून गाव मेटे शिवसेनेचे शाखा अध्यक्ष रविंद्र शिगवण व त्यांचे कार्यकर्ते सचिन पंडे, बाबु बुरटे, विनय शिगवण, हरि बुरटे, संतोष पंडे, शांताराम भुवड, कृष्णा गावडे, मनोहर खोचरे, सखाराम धाडवे, प्रदिप गावडे, सुरेश खोचरे.

यासोबतच विलास गावडे, संजय गावडे, रविंद्र खोचरे, दिनेश खोचरे, काशिराम गावडे, प्रसन्ना शिगवण, पांडुरंग गावडे, पांडुरंग बुरटे, शंकर खोचरे, संतोष गावडे, कृष्णा पंडे, सोनू खोचरे, जयंत शिगवण, भिकाजी पंडे,विनय खोचरे, शशिकांत शिगवण, संदिप कांदेकर, दिलीप खोचरे, शिवा खोचरे, शंकर खोचरे यांनी मनसेत जाहिर प्रवेश केला.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!