---Advertisement---

Breaking : विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोलेंनी दिला राजीनामा

On: February 4, 2021 5:29 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचे नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे.

नवीन विधानसभा अध्यक्ष कोण?
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पद सोडण्यास तयारी दाखवली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव चर्चेत आले आहे. जर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाले तर भविष्यात विधानसभा अध्यक्ष देखील बदलावे लागतील. त्या अनुषंगाने काँग्रेसमधील काही प्रमुख नेत्यांची नावं आता विधानसभा अध्यक्षपदासाठी प्राथमिक चर्चेला समोर येत आहेत. नाना पटोले यांच्या रिक्त जागेवर तीन काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची नावं चर्चेत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!