अक्कलकोट : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या संदर्भात आणि गरीब जनतेच्या वीजबिलासंदर्भात फसवणूक केलेली आहे,याबाबत त्वरित शासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू,असा इशारा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शुक्रवारी बोलताना दिला. भाजपच्यावतीने शुक्रवारी राज्यभर महावितरणला टाळा ठोको व हल्ला बोल आंदोलन करण्यात आले.या पार्श्वभूमीवर अक्कलकोट येथेही महावितरणला टाळा ठोकुन हल्लाबोल आंदोलन करण्यात
आले.त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, एकीकडे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने कायदे व शेतमालाला हमी भाव दुप्पट करण्यासंदर्भात प्रयत्न करत आहे तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार राज्यातील ७५ लाख वीज ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याची भाषा करत आहे. राज्यातील चार कोटी जनतेला अंधारात ठेवण्याचे पाप हे सरकार करत आहे, याची किंमत येत्या काळात सरकारला मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.सरकारला जाग आणण्यासाठी व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणे थांबवण्यासाठी व लॉकडाऊन काळात घरगुती वीज बिलात सवलत देण्यासाठी मोर्चा काढून आम्ही ते आंदोलन करत आहे.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या वीज बिलाबाबत पुनर्विचार करून वीज कनेक्शन तोडणे थांबवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड,शहराध्यक्ष शिवशरण जोजन, जेष्ठ नेते अप्पासाहेब पाटील,उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे,प्रभाकर मजगे,अप्पासाहेब बिराजदार, राजेंद्र बंदीछोडे, खय्युम पिरजादे, गुंडप्पा पोमाजी, राजशेखर मसुती, शिवशरण वाले, मिलन कल्याणशेट्टी, अप्पू परमशेट्टी, अप्पू कौटगी, श्रीशैल नंदर्गी, परमेश्वर यादवाड, महेश हिडोंळे, दयानंद बिडवे, रमेश कापसे, श्रीशैल ठोंबरे, सुरेखा होळीकट्टी, बाळा शिंदे, नागराज कुंभार, दयानंद बमनळी, प्रदिप पाटील, शंकर उणदे, धोंडीप्पा बनसोडे, स्वामीनाथ घोडके, सुधीर मचाले, अविनाश पोतदार, विनोद मोरे, सुनिल गवंडी, राहुल काळे,सचिन पवार, कांतू धनशेट्टी, बबलू कामनुरकर, छोटू पवार, अंबण्णा चौगुले, आलम कोरबू, परमेश्वर झळकी, सोन्या बापू शिंदे, गेनसिध्द पाटील, बसवराज हौदे, हणमंत कलशेट्टी, सुनिल सावंत, इरण्णा, बिराजदार, सोमनाथ पाटील, विशाल उडचाण, शिवप्पा हिळ्ळी, संतोष आळगी, भिमा तोरणगी, दिपक जरीपटके, स्वामीनाथ घोडके, शिवशंकर स्वामी, संकेत कुलकर्णी, राहूल वाडे, लखन झंपले, आणप्पा बिराजदार यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.