ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सचिन तेंडुलकरांचा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का? ; फडणवीसांचा सरकारला सवाल

नवी दिल्ली  – हॉलिवूड सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यानंतर कंगना राणावतने लागलीच आपला मोर्चा रिहानाकडे वळवला. रिहानाचे ट्विटनंतर कंगनाने लांबलचक पोस्ट लिहित उत्तर दिले. या दोघांच्या वादात पंजाबी गायक व अभिनेता दिलजीत दोसांज उडी घेत रिहानासाठी एक गाणं तयार केलं. यामुळे भडकलेल्या कंगनाने दिलजीतला खलिस्तानी संबोधले. सध्या ट्विटरवर शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या गटामध्ये आणि मोदी सरकारला पाठिंबा देणाऱ्यामध्ये चांगला वाद सुरु आहे. हा वाद सुरूच असतांना याच संदर्भात मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी एक ट्विट केलं आहे. मात्र त्यांच्या ट्विटमुळे विरोधात देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहे.

 

केरळमधून सचिनविरोधात आंदोलन करण्यासाठी युवा काँग्रेस रस्त्यावर देखील उतरली आहे. केरळमध्ये कोची याठिकाणी युवा कॉग्रेसने सचिनच्या कट-आउटवर काळं तेल ओतून सचिनचा निषेध व्यक्त करण्यात आला. शेतकरी कायद्यासंदर्भात सचिनने ट्वीट केलं होतं त्यानंतर या प्रतिक्रिया उमटत आहेत.


 

दरम्यान सचिनविरोधात झालेल्या या प्रकारानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी महाविकास आघाडीला सवाल करणारं एक ट्वीट केलं आहे. त्यांनी असं ट्वीट केलं आहे की, ‘केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे भूषण असलेले, भारतरत्न आणि मराठी माणसाचे अभिमान असलेले सचिन तेंडुलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?’ यावेळी त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेचं ट्वीट रीट्वीट केलं आहे, ज्यामध्ये केरळ युवा काँग्रेसने केलेल्या सचिनच्या विरोधाचे काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!