---Advertisement---

इंधन दर ; तपासा आजचे पेट्रोल-डीझेलचे दर

On: February 8, 2021 11:59 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वर्षभराच्या उच्चांकी स्तरावर गेल्या आहेत. ‘अनलॉक’नंतर इंधन मागणीत वाढ होत आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. मात्र तरीही आज सोमवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झालेला नाही. कंपन्यांनी आज सलग तिसऱ्या दिवशी इंधन दर स्थिर ठेवले. मात्र यापूर्वी झालेल्या दरवाढीने अनेक शहरात पेट्रोल उच्चांकी स्तरावर गेले आहे.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 86.95 रुपये आहे तर मुंबईत तो प्रतिलिटर 93.49 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोल दर लिटर 88.30 रुपये तर चेन्नईमध्ये ते 89.39 रुपये प्रति लिटर आहे.

आज डिझेलविषयी बोलायचं झालं तर दिल्लीत आज डिझेल 77.13 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर 83. 99 आहे. कोलकातामध्ये हा 80.71 रुपये आहे तर चेन्नईमध्ये डिझेलचा दर 82.33 ​​रुपये आहे.

प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

– दिल्ली (Delhi Petrol Price Today): 86.95 रुपये प्रति लिटर

– मुंबई (Mumbai Petrol Price Today): 93.49 रुपये प्रति लिटर

– कोलकाता (Kolkata Petrol Price Today): 88.30 रुपये प्रति लिटर

– चेन्नई (Chennai Petrol Price Today): 89.39 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमधील डिझेलचे दर

– दिल्ली (Delhi Diesel Price Today): 77.13 रुपये प्रति लिटर

– मुंबई (Mumbai Diesel Price Today): 83.99 रुपये प्रति लिटर

– कोलकाता (Kolkata Diesel Price Today): 80.71 रुपये प्रति लिटर

– चेन्नई (Chennai Diesel Price Today): 82.33 रुपये प्रति लिटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!