---Advertisement---

जीएसटीविरोधात 26 फेब्रुवारी रोजी ‘व्यापाऱ्यांची ‘भारत बंद’ची हाक

On: February 8, 2021 6:10 PM
Follow Us:
---Advertisement---

नागपूर: जीएसटीच्या विरोधात येत्या 26 फेब्रुवारी रोजी व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे. त्या दिवशी उद्योग-व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचं व्यापाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) ही बंदची हाक दिली असून या कायद्या विरोधात 26 फेब्रुवारी रोजी देशभरात चक्काजाम करण्याची घोषणाही केली आहे.

 

या आंदोलनाला ट्रान्स्पोर्ट सेक्टरची सर्वात मोठी संघटना असलेल्या ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट वेल्फेअर असोसिएननेही या आंदोलनाला पाठिंबा दिला असून या आंदोलनात प्रत्यक्ष उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

 

नागपूरमध्ये आजपासून सीएआयटीचं (कॅट) तीन दिवसाचं राष्ट्रीय व्यापार संमेलन सुरू झालं आहे. या संमेलनात देशातील सर्व राज्यातील 200 हून अधिक व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आले आहेत. कॅटच्या अंतर्गत येणारे देशातील 8 कोटी व्यापारी आंदोलनाला पाठिंबा देतील. तसेच ऑल इंडिया टान्स्पोर्ट वेल्फेअर असोसिएशनही या आंदोलनात सहभागी होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!