---Advertisement---

किनगाव अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत

On: February 15, 2021 3:10 PM
Follow Us:
---Advertisement---

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई : जळगाव जिल्ह्यातील किनगाव (ता. यावल) येथे पपई घेऊन जाणाऱा टेम्पो पलटी होऊन त्यात १५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. दरम्यान मृत मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाखांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. सर्व मृत मजूर हे रावेर तालुक्यातील रहिवाशी आहेत. मृतांमध्ये सहा महिला व नऊ पुरूष आहेत. या घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. अपघातात जखमी झालेल्या मजुरांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
संबंधित अपघातग्रस्तांना सर्व ती आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!