---Advertisement---

BIG BREAKING: आणखी एका राज्यातील कॉंग्रेस सरकार कोसळले !

On: February 22, 2021 12:15 PM
Follow Us:
---Advertisement---

पुडुचेरी: कॉंग्रेस पक्षाच्या हातातील आणखी एका राज्यातील सत्ता गेली आहे. कर्नाटकनंतर कॉंग्रेसला पुडुचेरी राज्यातील सरकार गमवावे लागले आहे. पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याने सरकार अल्पमतात येऊन कोसळले आहे. पुडुचेरी विधानसभेत आज सोमवारी बहुमत चाचणी घेण्यात आली. अध्यक्षांनी मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याची घोषणा केली. विधानसभेत पोहोचण्यापूर्वी मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी त्यांच्याकडे बहुमत असल्याचा दावा केला होता. परंतु बहुमत चाचणी घेतांना त्यात यश आले नाही.

काँग्रेसचे आमदार के लक्ष्मीनारायण आणि द्रमुखचे आमदार व्यंकटेशन यांनी काल रविवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ३३ सदस्यीय विधानसभेत काँग्रेस-द्रमुक आघाडीच्या आमदारांची संख्या ११ झाली. तर विरोधीपक्षांचे सध्या १४ आमदार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!