ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बाप रे … अक्कलकोटमध्ये हे काय आंदोलन ! मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे अनोखे आंदोलन

 

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अक्कलकोट शहरातील विविध विषयांना घेऊन सोमवारी अर्ध नग्न आंदोलन करण्यात आले . शहरातील एवन चौक येथील हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरण करणे,कारंजा चौकीतील तारा माता उद्यानाचे सुशोभिकरण करणे,चर्मकार वस्तीत समाज मंदिर बांधणे, राजीव नगर बुद्ध वस्ती येथे समाज मंदिर बांधणे, रमाई घरकुल आवास योजनेचे हप्ते जमा करणे, प्रियदर्शनी मंगल कार्यालय समोर येईल आयर्लंड सुशोभिकरण करणे, इत्यादी मागणीसाठी नगरपरिषद अक्कलकोटसमोर वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटच्यावतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.यावेळी अक्कलकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी पाटील, नगरसेवक बसलिंग खेडगी यांनी वरील सर्व कामाच्या निविदा काढून वंचित बहुजन आघाडीने केलेल्या मागणीला लेखी पत्राद्वारे मंजूर झाले आहे,असे कळविल्यानंतर अर्धनग्न आंदोलन स्थगिती करण्यात आले. या आंदोलनाला एमआयएम शहराध्यक्ष इरफान दावा ना, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष सुनील शिंगे, प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अमर शिरसाट, लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष राहुल ढोबळे यांनी पाठिंबा जाहीर केला.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर मडी खांबे, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष देवानंद अस्वले,शीलामनी बनसोडे, राहुल मोरे, संदीप मडीखांबे, नागेश हरवाळकर, चणू शिंगे, खाजाप्पा एवाळे, प्रकाश शिंदे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अध्यक्ष रवी पोटे, सुभाष गायकवाड, राहुल हरवाळकर, दशरथ मडीखांबे, अंबादास शिंगे, श्याम बनसोडे,उमेश बनसोडे, खाजाप्पा शिवशरण, आनंद सोनकांबळे, नरसिंह गायकवाड,विकास गायकवाड, रमेश बनसोडे, बंटी नडगम, महादेव बनसोडे, शेखर हरवाळकर, दत्ता हरवाळकर, आनंद मोरे ,महाराष्ट्र कर्मचारी कामगार संघटनेच्या अक्कलकोट तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे हुचप्पा शिंगे,दिलीप शिंगे आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!