पंजाब : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे बंधू एस. एस. कोहली यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केलाय.
गुजरातमधील सुरत येथे नुकत्याचं पार पडलेल्या महापालिका निवडणूकीत 15 जागा जिंकत आप हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी सध्या भारतीय राजकारणात स्वत: चं अस्तित्व सिद्ध करत आहे.
एस. एस. कोहली यांच्यासोबत काँग्रेस मजदूर विभागाचे अध्यक्ष साहिब सिंग, माजी बँक पदाधिकारी जे.एस.बिंद्रा, तरसेम सिंग रानीके, मंजीत सिंह वडाली बूटासिंंग संगतपुरा, निशान सिंग ग्रिडिंग, मजार सिंग यांच्यासह अन्य नेत्यांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केल्याने पंजाब काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.