---Advertisement---

सोलापूरकरांसाठी गुडन्यूज.. “या” तारखेपासून विमानसेवा सुरु होणार

By team
On: November 15, 2024 9:04 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर वृत्तसंस्था 

 

सोलापूरकरांसाठी खुशखबर आहे. २० डिसेंबरपासून होटगी रोड सोलापूर विमानतळावरून मुंबई आणि गोवासाठी थेट विमानसेवा सुरुवात होणार आहे. त्यामुळे मुंबई- गोवा सेवा सुरु होण्यातला अडथळा दूर झाला आहे. सोलापूरकरांची बहुप्रतिक्षित विमानसेवा सुरू होणार आहे. असा दावा सोलापूर विकास मंचने केला असून याबद्दलची पोस्ट समाजमाध्यमात व्हायरल झाली आहे. विमानसेवे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

या पोस्टला सोलापूर विमानतळाच्या सहाय्यक सरव्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. याबाबत दोन दिवसांतच अधिकृत घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूर विकास मंचकडून व्हायरल करण्यात आलेल्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, होटगी रोड विमानतळावरून फ्लाय ९१ एअरलाईन्सची विमानसेवा २० डिसेंबरपासून सुरु होणार असून मुंबई आणि गोवा येथून थेट उड्डाणे दिली जाणार आहेत. सोलापूर विकास मंचाच्या अथक प्रयत्नांमुळेच हे स्वप्न साकार होऊ शकले असेही त्यांनी म्हटले आहे.

 

विकासमंचने जाहीर केलेले वेळापत्रक

 

सोलापूर – मुंबई सकाळी ९:४० वाजता (सकाळी १०:४० मुंबई आगमन)

 

मुंबई – सोलापूर दुपारी १२:४५ वाजता (दुपारी १:४५ सोलापूर आगमन)

 

सोलापूर – गोवा दुपारी २:१५ वाजता (दुपारी ३:१५ गोवा आगमन)

 

गोवा – सोलापूर सकाळी ८:१० वाजता (सकाळी ९:१० सोलापूर आगमन)

 

सोलापूर येथील विमानसेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सध्या व्हायरल होत असेलेली माहिती अधिकृत नाही. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. पोस्टमधील एअरलाईन्सचे प्रस्ताव आहेत. मात्र त्याला अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही. मंजुरी देताच याबद्दलची माहिती दिली जाईल. बुकिंगची व्यवस्था ऑनलाईन असेल.

 

– अंजली शर्मा, सहाय्यक सहव्यवस्थापक, सोलापूर विमानतळ

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!