सरपंचपदाची सुरूवात मंदिराच्या जीर्णोध्दार व वेशीच्या बांधकामाने ! चपळगावच्या सरपंचपदी उमेश पाटील बिनविरोध तर उपसरपंचपदी डाॅ.अपर्णा बाणेगाव
अक्कलकोट, दि.२६ : उत्तर भागात चुरशीच्या ठरलेल्या चपळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उद्योजक
उमेश पाटील यांची तर उपसरपंचपदी डाॅ.अपर्णा बाणेगांव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडी
शुक्रवारी पार पडल्या.सरपंचपदी उद्योजक उमेश पाटील यांची निवड झाल्यानंतर दुसऱ्याच क्षणी त्यांनी गावातील हनूमान मंदिर व वेशीचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला.या बांधकामासाठी त्यांनी वैयक्तिक एक लाख एक्कावन हजार रूपयांची देणगी जाहीर केली. चपळगाव हे एक सध्या उद्योजक आणि डॉक्टरांच्या हाती गेल्याने विकासाचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. अध्यासी सभेचे अधिकारी प्रभाकर कांबळे यांच्या नियंत्रणाखाली सरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली.सरपंच व उपसरपंचपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने अखेर बिनविरोध निवड झाल्याचे प्रभाकर कांबळे यांनी घोषित केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडीनंतर कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता सरपंच उमेश पाटील यांनी जनतेचे आभार मानले.
यावेळी ग्रा.प.सदस्या सुवर्णा कोळी,वर्षा भंडारकवठे,रेश्मा तांबोळी,वंदना कांबळे,गौराबाई अचलेरे,धनश्री वाले,चित्रकला कांबळे, मल्लिनाथ सोनार,श्रावण गजधाने,गंगाबाई वाले,स्वामीराव जाधव आदी सदस्य उपस्थित होते.निवड प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामसेवक एस.बी.कोळी, प्रकाश बुगडे,विजय कोरे,चिदानंद हिरेमठ,तम्मा कांबळे आदींनी परिश्रम घेतले.ग्रामपंचायत निवडणूकीत येथील जनतेने ग्रामदैवत श्री मल्लिकार्जून ग्रामविकास पॅनलला घवघवीत यश मिळवून दिले होते. विजयासाठी सिध्दाराम भंडारकवठे, बसवराज बाणेगांव, महेश पाटील,रियाज पटेल,पांडूरंग चव्हाण,अप्पासाहेब पाटील,अभिजीत पाटील,प्रभाकर हंजगे,सुरेश सुरवसे,अंबणप्पा भंगे,डाॅ.काशिनाथ उटगे,प्रभाकर हंजगे,सुरज विजापूरे,चंद्रशेखर शिवगुंडे,गनी पटेल आदींनी परिश्रम घेतले. निवडीनंतर नुतन सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंभूलिंग अकतनाळ यांनी तर आभार विठ्ठल पाटील यांनी मानले.
उमेश पाटील दुसऱ्यांदा सरपंचपदी..
उद्योजक उमेश पाटील यांची दुसऱ्यांदा सरपंचपदी वर्णी लागली.याअगोदर चपळगावचे सरपंचपद भुषविताना
त्यांनी गावचा सर्वांगीण विकास साधला होता.यामूळेच त्यांची पून्हा एकदा सरपंचपदी निवड झाली.तर भूविकास
बॅकेचे दिवंगत चेअरमन सुर्यकांत बाणेगाव
यांची कन्या डाॅ.अपर्णा बाणेगांव यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे.