अक्कलकोट,दि.२७ : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अक्कलकोट व श्रीमंत शहाजी राजे भोसले वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.
यावेळी वि.वा. शिरवाडकर ( कुसुमाग्रज) यांच्या जयंती निमित्त कुसुमाग्रज यांच्या सहित्याची पुजन करून त्यांच्या प्रतिमेस प्रा.प्रकाश सुरवसे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.
मराठी ही समृद्ध भाषा असुन आपली मातृभाषा आहे. त्या भाषेचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे.
आजकाल इंग्रजी शाळेचे महत्व वाढत चालले आहे. परंतु उच्च शिक्षणामध्ये मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी चमकतो. या वरूनच मराठी ही भाषा किती दर्जेदार आहे हे समजते. म्हणून मराठी या आपल्या मातृभाषेवर सर्वांनी प्रेम करावे. असे प्रा. प्रकाश सुरवसे यांनी सांगितले.
मराठी भाषा टिकली तरच वाचन संस्कृती व ग्रंथालये टीकतील असे ज्येष्ठ शिक्षक शंकर व्हनमाने यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ. शैलशिल्पा जाधव या होत्या.कार्यक्रमाचेे आभार प्रदर्शन सुरेश भोसले यांनी केले.
या प्रसंगी प्रा. भिमराव साठे, माजी मुख्याध्यापक मोहन चव्हाण, ग्रंथपाल दत्तात्रय बाबर, दिनकर शिंपी, सिध्दाराम आलूरकर, आनंद बेळगावंकर, सौ.स्नेहा नरके, महादेव शिरसाठे आदी उपस्थित होते.