---Advertisement---

गुरववाडीच्या सरपंचपदी लक्ष्मीबाई पुजारी तर उपसरपंचपदी जगदेवी स्वामी यांची निवड

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२७ : अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडीच्या सरपंचपदी लक्ष्मीबाई पुजारी तर उपसरपंचपदी
जगदेवी स्वामी यांची निवड करण्यात
आली. निवडीनंतर पुजारी गटाने एकच जल्लोष केला.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सात पैकी चार जागा जिंकून पुजारी गटाने वर्चस्व प्रस्थापित केले होते. अतिशय चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत पुजारी गटाने विरोधकांचा जोरदार पराभव केला. यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य लक्ष्‍मीबाई पुजारी, पॅनल प्रमुख म्हाळप्पा पुजारी, अंबव्वा कोळी, मल्लिकार्जुन इंगळगी, जगदेवी स्वामी, बसवराज देवरमनी, सारिका वंकारी उपस्थित होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के.जी धुमाळ यांनी काम पाहिले.

यावेळी ग्रामसेवक जाधव हे देखील उपस्थित होते. सरपंच निवडीच्या कार्यक्रमाप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य बसवराज पुजारी, श्रीमंत वंकारी, शिवपुत्र आलुरे, सायबणा हळखेड, दत्ता सावळी, बसवराज मुनाळे,
श्रीशैल रावजी, दिलीप बोरगाव, मल्लिकार्जुन मुस्ती यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर बोलताना पुजारी यांनी गावचा कायापालट करून गुरववाडी गावाला आदर्श करू. दक्षिण भागांमध्ये हे गाव रोल मॉडेल
बनवू,असे सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!