---Advertisement---

राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया: काय बोलले राठोड!

On: February 28, 2021 5:14 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी चर्चेत असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी आज रविवारी अखेर राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केल्यानंतर संजय राठोड यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजीनामा दिल्यानंतर ते  प्रसारमाध्यमांमोर आले. ‘मी माझा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आताच दिलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या बजारा समाजाची तरूणी पूजा चव्हाण हिच्या दुदैवी मुत्यूवरून विरोधी पक्षानी घाणेरडे राजकारण केले गेले. माझ्या समाजाची बदनामी केली गेली. म्हणूनच यातील खरे सत्य बाहेर यावे, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशीच माझी भूमिका आहे’ असे संजय राठोड यांनी सांगितले.

मुंबईतील वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते आपले म्हणणे मांडत होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!