मुंबई:आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात झाले. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम ठरला आहे. कोरोनाविरोधातील लढाऊ सुरू असून राज्य सरकारने आता मी जबाबदार योजना सुरू केली आहे,” असं म्हणत राज्यपालांनी राज्य सरकारचे कौतुक केले.
कोरोना विरोधात लढा देण्यासाठी राज्य सरकारने चांगली कामगिरी केली आहे. ‘धारावीसारख्या परिसरात राज्य शासनाने प्रभावीपणे काम केले आहे. कोरोनासंबंधी मदतीसाठी टास्क फोर्स स्थापन केले. आरोग्य सुविधांमध्येही आता वाढ करण्यात आली आहे. कोरोनाच्या चाचण्यांसाठी प्रयोग शाळांची संख्याही वाढवण्यात आली आहे,” अशी माहिती राज्यपालांनी यावेळी दिली.
मंदी असतानाही राज्य सरकारने चांगले काम केले आहे. रोजगार मिळणं सुलभ व्हावे यासाठी सरकारनं महारोजगार आणि महाजॉब्ज या पोर्टलची सुरूवात केली. आर्थिक अडचण असतानाही राज्य सरकारं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असेही राज्यपालांनी सांगितले.