ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मूळचे सोलापूरचे आणि सध्या पुण्यात स्थायिक असलेले चित्रकार खरटमल दाम्पत्याचे  “गिफ्ट ऑफ लव्ह” शिर्षकाखाली मुंबईत चित्र प्रदर्शन

पुणे – पुण्यातील प्रसिद्ध चित्रकार दाम्पत्य वर्षा   खरटमल व  रामचंद्र खरटमल यांच्या चित्रांचे प्रदर्शन “gift of love” ” गिफ्ट ऑफ लव्ह ” या शिर्षकाखाली कुलाबा आर्ट गॅलरी वरळी मुंबई येथे भरले आहे. १० मार्च २०२१ पर्यंत सर्वांसाठी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ पर्यंत बघण्यासाठी खुले आहे. ह्या प्रदर्शनात एकुण ३५ चित्रे प्रदर्शित केली आहेत.


रामचंद्र खरटमल हे नॅशनल अवार्ड विनर चित्रकार आहेत. त्यांची आजपर्यंत देशांतर्गत व देशाबाहेर अनेक ठिकाणी चित्रप्रदर्शन झालेली आहेत. त्यांची चित्रे अनेक प्रसिध्द व्यक्ति, कला संग्रह , म्यझियम मधे संग्रहित आहेत. गोधडी व ब्युटी चित्रमालिकेतील चित्रे ह्या प्रदर्शनात प्रदर्शित केली आहेत. वर्षा खरटमल यापण अनेक पारितोषिके प्राप्त चित्रकर्ती आहेत. त्यांची पण चित्रे अनेक ठिकाणी प्रसिध्द व्यक्ती, कलारसिक, संग्रहालयमधे संग्रहीत आहेत. त्यांचीसुद्धा देश – विदेशात चित्र प्रदर्शने झाली आहेत.

भारतीय चित्र परंपरांवर आधारीत त्यांची चित्र शैली आहे. त्याच्या चित्रांचे विषय प्रामुख्याने मराठी स्री वर आधारीत आहेत. मराठी स्रीचा साजशुंगार हा मोहीत करणारा आहे.अशा या चित्र दांपत्याचे चित्र प्रदर्शन कुलाबा आर्ट गॅलरीत जावून जरूर पहावे. हि संधी कुलाबा आर्ट गॅलरीचे श्री व सौ सबनीस आणि आर्ट ॲम्बेसिचे प्रशांत वेदक ह्यांनी मुंबई करांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!