---Advertisement---

आता भाजपनेही ती चूक मान्य करुन माफी मागावी

On: March 3, 2021 11:28 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई: कॉग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी कॉग्रेस पक्षाने अर्थात इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या आणिबाणीच्या निर्णयावर भाष्य केले आहे. तब्बल 45 वर्षांनंतर राहुल गांधी यांनी आणीबाणीचा निर्णय चुकीचा होत असे मान्य केले आहे. दरम्यान आता भाजपनेही गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.विधानभवनाच्या मिडिया हाऊस येथे मंत्री नवाब मलिक यांनी ही मागणी केली आहे. जर काँग्रेस चूक सुधारण्याचा प्रयत्न करत आहे तर भाजप केव्हा चूक सुधारणार याची माहिती जनतेला द्यावी. दिल्ली दंगलीबाबत काँग्रेसने माफी मागितली होती, आता गुजरात दंगलीबाबत भाजपने माफी मागावी असेही नवाब मलिक म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!