ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार “इतक्या” महिन्यांनंतर विदेश दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल १६ महिन्यानंतर परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. कोरोना महामारीमुळे गेल्या अनेक दिवसांपासुन पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्याही परदेश दौर्यावर गेले नव्ह्ते. येत्या २७  मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मोदींचा हा दौरा अनेक कारणांमुळे चर्चेत राहाणार आहे. भारत आणि बांग्लादेशच्या राजकीय मैत्रीला ५० वर्षे पुर्ण होत आहेत. बांग्लादेशची राजधानी ढाका ते बंगाल दरम्यान प्रवासी रेल्वेला मोदी हिरवा कंदील देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संपुर्ण जगावर आलेल्या कोरोनासंकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहीलाच परदेश दौरा असणार आहे. भारताकडुन इतर देशांना पाठविण्यात आलेल्या कोरोना लसीमध्ये सर्वाधिक म्हणजेच ९० लाख कोरोना लसीचे डोस एकट्या बांग्लादेशला पुरवण्यात आले आहेत.

डिसेंबरमध्ये बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत झालेल्या ऑनलाईन मिटींगनंतर मोदींनी बांग्लादेश दौरा करणार असल्याचं घोषित केलं होतं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!