अक्कलकोट दि, ८ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वीर पत्नीचा सन्मान तहसीलदार अंजली मरोड यांच्या हस्ते करण्यातआला. अध्यक्षस्थानी नायब तहसिलदार बालाजी बनसोडे हे होते.या कार्यक्रमाचे आयोजन विश्वगुरू महात्मा बसवेश्वर साहित्य परिषद, महाराष्ट्र यांच्यावतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वामींनाथ हरवाळकर यांनी केले.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वीर पत्नीचा सन्मान म्हणजे तमाम माता भगिनींचा सन्मान असल्याचे तहसीलदार अंजली मरोड यांनी सांगितले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्क मधील स्त्री कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी ऐतिहासिक आंदोलन केले. त्या दिवसाचे स्मरण म्हणून हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून घोषित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वीर पत्नी सुगलाबाई गंणमुखी यांनी स्त्रीशक्ती हीच राष्ट्र शक्ती असल्याचे सांगून स्वातंत्र्य लढ्यातील महिलांचे योगदान समजावून सांगितले.
यावेळी विरपत्नी कस्तुरबाई रामा गायकवाड, पुतळाबाई ज्ञानदेव दोडमनी, सुशिलाबाई राचप्पा ठमके, जैतूनबी रजाक नाग्नल्ली,संगमा संगोळगी यांचा फेटा, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात आले.त्याचबरोबर तहसील कार्यालयातील महिला कर्मचारी माडे,गवळी,माईंदरकर, करमाळकर, इरकशेट्टी,गोवे, शेख, साळुंखे,भगत, हुल्ले यांचाही सत्कार करण्यात आला. हा सोहळा येथील तहसील कार्यालयाच्या आवारात समारंभपूर्वक पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नूरदिन मुजावर तलाठी, इर्शाद मुजावर, चंद्रकांत इंगवले सर्कल, सिकंदर चाउस यांनी परिश्रम घेतले.