---Advertisement---

चपळगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हीड प्रतिबंधक लसीकरण

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.८ : अक्कलकोट तालुक्यातील चपळगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना व ४५ ते ६० वर्ष वयोगटातील बी.पी.शुगर असलेल्या नागरीकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबविण्यात आली. ही लसीकरण मोहीम तालुका वैद्यकीय अधिकारी आश्विन करजखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली .

याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती सुनंदा गायकवाड, पंचायत समितीचे सदस्य खय्युम पिरजादे, सिद्धार्थ गायकवाड, ज्येष्ठ नेते के.बी.पाटील, अंबणप्पा भंगे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.काशिनाथ हलकुडे आदी उपस्थित होते.

या लसीकरण कार्यक्रमात पंचवीस जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य सहाय्यक परमेश्वर बिराजदार, आरोग्य सेवक सिध्देश्वर चटमुटगे, ओमशंकर स्वामी, सुनिल माशाळे, आरोग्य सेविका श्रीमती पडवळ, शेख, पाटील, बनसोडे, कांबळे आदीनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!