ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाशिवरात्रीसाठी अक्कलकोटमध्ये रताळाला मोठी मागणी

अक्कलकोट, दि.१० : उद्या गुरुवारी सर्वत्र महाशिवरात्रीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे या पार्श्वभूमीवर रताळा मोठी मागणी असून अक्कलकोट तालुक्यात त्यातून मोठी उलाढाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

महाशिवरात्रीच्या आधी एक दिवस गावोगावी रताळ विक्रीचा व्यवसाय जोमाने सुरू असतो या वर्षी देखील तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे तोरणा जरी असला तरी हा उपवास लोक विसरत नाहीत.उपवासाच्या पदार्थांमध्ये आवडीने खाल्ले जाणारे रताळे बाजारात विक्री साठी दाखल झाले आहे. खास महाशिवरात्रीसाठी रताळांची मागणी असते.वागदरी येथील रताळाला मोठी मागणी असते.

 

दरवर्षी महाशिवरात्रीच्या आधीच वागदरी येथील शेतकरी मोठया प्रमाणात उत्पादन घेऊन गुलबर्गा,मुंबई,पुणे,सोलापूर,लातूर अक्कलकोट व आळंद या बाजार पेठेत पाठवले जाते.वागदरी येथील दरवर्षी रताळी उत्पादन घेणारे कणमुसे, निबाळे,भरमदे,यमाजी,पोमाजी व शिरवळवाडी येथील शेतकरी रताळ उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात.या रताळाला मोठी मागणी देखील आहे.रताळाला योग्य भाव मिळावे हिच मागणी येथील शेतकऱ्यांची आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!