ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराष्ट्र -कर्नाटक वाद चिघळला; दोन्ही राज्याकडून एसटीची वाहतूक बंद

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळण्याची स्थिती यामुळे निर्माण झाली आहे. कर्नाटकमधील अज्ञात व्यक्तीकडून महाराष्ट्र एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ही घटना घडली. त्यानंतर आता दोन्ही राज्याकडून एसटीची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर अज्ञात व्यक्तीने राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. याआधी शुक्रवारी कन्नड रक्षण वेदीकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर हल्ला केला होता आणि गाडीवरील झेंडा काढून कारची तोडफोड केली होती. त्यानंतर कोल्हापुरातील शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी कोल्हापूर बस स्थानकावर आंदोलन करत कर्नाटक राज्याची बससेवा बंद केली. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत कर्नाटक रक्षण वेदिके संघटनेच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिलं.

दगडफेकीनंतर दोन्ही राज्यांकडून एसटीची वाहतूक बंद करण्यात आली आहे. कर्नाटक रक्षण वेदीकेच्या कार्यकर्त्यांच्या बेळगावातील हल्ल्यानंतर शिवसैनिकांनी शुक्रवारी कर्नाटकची बस रोखली होती. आता कोल्हापुरातील बस स्थानकावर एसटी बसवर दगडफेक झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!