---Advertisement---

सचिन वाझेंच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे चर्चेला उधाण

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : मनसुख हिरन यांच्या मृत्यूप्रकरणी वदात सापडलेले मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांची बदली झाल्यानंतर वाझेंची व्हॉट्सअप स्टेटसमुळे सर्वांची भुवया उंचावली आहेत. जगाला आता गुडबाय करण्याची वेळ आली आहे अस सुचक स्टेटस सचीन वाझे यांनी ठेवल्यामुळे  या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. सचीन वाझेंची कालच नागरिक सुविधा केंद्रात बदली करण्यात आली आहे.

३ मार्च २००४ पासून काही सीआयडी अधिकाऱ्यांनी एका खोट्या प्रकरणात मला अटक केली होती. त्या प्रकरणात आत्तापर्यंत काहीच निष्पन्न झालं नाही. पण आता इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसतेय. माझे सहकारी मला पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत असं सचिन वाझेंनी म्हटलं आहे. तेव्हाच्या घटनेतआणि सध्याच्या घटनेत फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे अपेक्षा, सहनशीलता, आयुष्य आणि नोकरीही होती. आयुष्य आणि सेवेची १७ वर्ष होती. होती. मात्र आता माझ्याकडे आयुष्याची ती १७ वर्षही नाहीत, ना नोकरी करण्याचा संयम. आता या जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आली आहे, असं मला वाटतय, असंही सचिन वाझेंनी म्हटलं आहे. असं व्हॉट्सअप स्टेटस सचिन वाझे यांनी ठेवली आहे. सचिन वाझेंच्या या व्हॉट्सअॅप स्टेटसनंतर खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!