---Advertisement---

अक्कलकोटमध्ये उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको, लाॅकडाऊनमधील वीज बिल माफ करण्याची मागणी

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.१८ : सध्या अक्कलकोट तालुक्यात महावितरण कंपनीकडून सक्तीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे.एका बाजूला सरकारने अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांवर सक्ती केली जाणार नाही असे सांगितले जाते.इकडे मात्र महावितरण कंपनीचे कर्मचारी सक्तीने वीज कनेक्शन तोडले जात आहे. यासाठी उद्या १९ मार्चला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अक्कलकोट येथील महावितरण कार्यालय समोर सोलापूर अक्कलकोट रोडवर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

तसेच लाॅकडाऊनच्या काळातील वीज बिल तात्काळ माफ झाले पाहिजे,तसेच शेतकऱ्यांना वीज बिल माफी देऊन
त्यांचे कनेक्शन तोडणे तत्काळ थांबले पाहिजे आणि त्यांना हफ्त्यामध्ये बिल भरण्याची सुविधा मिळाली पाहिजे.यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना १९ मार्चला राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे नेते अमोल हिप्परगी यांनी सांगितले.

या वेळी संतोष अंबड,रत्नशील जैनजांगडे,मनोज जाधव,सागर माने,मारुती माने,रुद्रमुनी स्वामी,विजय मठ,सिद्धाराम इमडे,खय्युम जमादार,अमोल गुरव,अविनाश कदरगे, वजीर जमादार,प्रकाश पाटील,सचिन खडके,बसवराज म्हेत्रे,गोपाळ कुंभार आदी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!