---Advertisement---

गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अक्कलकोट भाजपची मागणी

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२१ : महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशा प्रकारची मागणी अक्कलकोट भाजपच्यावतीने करण्यात आली आहे. अक्कलकोट भाजपच्यावतीने महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे कमिशनर परमवीर सिंघ यांनी सचिन वाझे यांच्याकडून दर महा १०० कोटी रुपये खंडणी मागत होते,असे पत्र मुख्यमंत्री यांना पुराव्यासहित लेखी दिले. यावरुन महाविकास आघाडीतील गृहमंत्री हे भ्रष्ट असल्याचे दिसून येते,तरी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा व मंत्रीपदापासून दूर करावे,असे निवेदन तहसीलदार यांचे प्रतिनिधी सोनटक्के यांना देण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन,पक्षनेते महेश हिंडोळे, महिला अध्यक्ष सुरेखा होळीकटटी, युवा मोर्चा अध्यक्ष दयानंद बमनळ्ळी, बसवंत कलशेट्टी, दयानंद बिडवे, रमेश कापसे
आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!