ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सचिन वाझे प्रकरणानंतर आता पोलिस दलातील बदल्यांचे रॅकेट, देवेंद्र फडणवीस यांनी टाकला सरकारवर नवा बॉम्ब !

मुंबई : सचिन वाझे आणि गृहमंत्र्यांचे प्रकरण ताजे असतानाच आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर नवा बॉम्ब टाकला आहे.त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे सरकारच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गृहमंत्री देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्र लिहून गंभीर आरोप केल्यानंतर आता भाजप आणखी आक्रमक झाले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर पेनड्राइव्हचा डेटाबॉम्ब टाकला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांसमोर पोलीस दलात बदल्यांसाठी सुरु असलेल्या रॅकेटचा तपशील मांडला. गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ही सगळी माहिती पोलीस महासंचालकांना दिली होती. त्यानंतर ही माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. मात्र, त्यावर कारवाई होणे तर सोडाच पण उलट रश्मी शुक्ला यांची बढती रोखण्यात आली, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी ११ वाजता मुंबईतील भाजप मुख्यालयात पत्रकार परिषेद घेतली. १५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत गृहमंत्री अनिल देशमुख विलगीकरणात नव्हते. ते मुंबईमध्येच होते. यासंदर्भातील शासकीय माहिती माझ्यारकडे आहे, असा दावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांन दिलेली माहिती चुकीची आहे, असेही ते म्ह‍णाले. फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल सादर करुनही राज्य सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. यासंदर्भातील ठोस पुरावे आपल्यारकडे आहेत. आज केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सचिवांची भेट घेवून माझ्या‍कडील पुरावे त्यांना देणार आहे, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!