---Advertisement---

खरंच ते पत्र परमबीर सिंग यांनी लिहिले होते का ? खा. संजय राऊत यांनी पत्रावरच उपस्थित केला सवाल !

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशी संदर्भात प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावर शंका व्यक्त केली आहे. खरंच परमबीर सिंग यांनी ते पत्र लिहिले का ? त्यांना कोणीतरी लिहून दिले आणि त्यांनी ते दिले असा प्रश्न निर्माण होत आहे,
असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

अनिल देशमुख हे पहिल्या दिवसापासून चौकशी करा, असे सांगत आहेत. चौकशीला कोणाचाही नकार नव्हता. मुख्यमंत्री, अनिल देशमुख, आम्ही चौकशी करा म्हणत होतो. अनिल देशमुख यांच्या चौकशीसंदर्भात निवृत्त न्यायाधीशांची चौकशी नेमली तर राजीनाम्याची गरज नसते, असे संजय राऊत म्हणाले. आमच्यासाठी हा विषय संपला असून यावर आता जास्त चर्चा होता कामा नये. यामध्ये विशेष घडामोडी घडतील असं वाटत नाही असे संजय राऊत म्हणाले.

यावेळी संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले कि, फक्त विरोधी पक्षनेते म्हणतात चौकशी नको,  वारंवार राजीनाम्याची आणि सरकार बरखास्त करण्याची मागणी यामुळे विरोधी पक्षाचं हसे झाले आहे. लोक त्यांना मूर्खात काढतात हे समजले पाहिजे असे संजय राऊत म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!