---Advertisement---

तैवानमध्ये रेल्वे अपघात, ३४ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Follow Us:
---Advertisement---

तैवान : तैवानच्या पूर्व भागामध्ये एक रेल्वे रुळावरुन घसरल्याने मोठा अपघात झाला आहे. यामध्ये ३४ लोकांचा मृत्यू झाला असून, कित्येक लोक जखमी झाल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या रेल्वेमध्ये ३५० प्रवासी प्रवास करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, टेकडीवरुन जाणारा एक ट्रक अपघातामुळे रेल्वे रुळांवर कोसळला होता. नेमकी यावेळी बोगद्यातून येणारी एक रेल्वे या ट्रकला धडकली, आणि रुळावरुन खाली घसरली. या रेल्वेचा कित्येक भाग अजूनही बोगद्यामध्ये अडकला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!