---Advertisement---

ब्रेकिंग…!गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला राजीनामा

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे.याबाबतची माहिती राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीला मुंबई हायकोर्टाने ग्रीन सिग्नल दिला आहे. यामुळे अडचणीत सापडलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपला मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

नवाब मलिक पत्रकार परिषदेत सांगितले की,गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचेकडे राजीनामा सोपवण्याचा इच्छा व्यक्त केले. या निर्णयावर शरद पवार यांनी होकार दिला.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा शरद पवार यांच्याकडे दिला असून अनिल देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत.

अनिल देशमुख यांनी त्यांचा राजीनामा ट्विट करत मुख्यमंत्र्यांना त्यांनी लिहिलेलं पत्रही त्यांनी जोडले आहे. यात अनिल देशमुख यांनी असं लिहिलं आहे की,‘मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे अॅड.जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये ५ एप्रिल २०२१ रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्या अनुषंगाने मी गृह पदावर राहणे मला नैतिक दृष्ट्या योग्य वाटत नाही,म्हणून मी स्वत:हून या पदापासून राहण्याचा निर्णय घेत आहे,असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!