---Advertisement---

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला विरोधकांचा समाचार

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे.राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेत राज्य सरकारने लॉकडाऊन केले.यावरून राज्य राजकारण रंगले आहे

लॉकडाउन, व्हेंटिलेटर,रेमडेसीविर इनजक्षेनं आणि इतर कारणावरून विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर वारंवार टीका करत आहेत.आता यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतली आहे.

राज्याने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे.परंतु,ज्यावेळेस दिवे पेटवले,ताट वाजवली त्यावेळेसचे लॉकडाऊन योग्य होते काय? हे जनतेला विरोधकांनी समजून सांगावे. मग बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरे राज्य सरकार आणि काँग्रेस देईल, अशा शब्दांत पटोले यांनी विरोधकांना कानपिचक्या दिली आहे.

तसेच नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही टीका केली आहे. देश कोरोना महामारीत होरपळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देशातील नागरिकांना वाऱ्यावर सोडून पश्चिम बंगालमधील निवडणुकीत व्यस्त आहेत असे नाना पटोले यांनी म्हंटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!