पुणे : कोरोना संसर्गाला आळा बसावा यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय योग्य ठरताना दिसत आहे. राज्यात आज तब्बल १५ दिवसांनंतर नव्या कोरोनाबाधितांचा आकडा हा ५० हजारांच्या खाली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात सुरू असलेला कोरोनाचा कहर आणि वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली होती. मात्र, आता एक सकारात्मक बातमी अशी की काल सोमवारी २६ एप्रिल रोजी राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट झाली आहे.
राज्यात आज ४८ हजार ७०९ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर आणखी एक चांगले वृत्त असे की, सोमवारी कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडाही मोठा आहे. राज्यात तब्बल ७१ हजार ७३६ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात काल एकूण ६ लाख ७४ हजार ७७० सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४३ लाख ४३ हजार ७२७ झालीय.
राज्यात काल ५४२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५ टक्के एवढा झाली आहे.