ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर बद्दल नकारार्थी बोलणे बंद करा- सहस्त्रबुद्धे

सोलापूर दि.१४ : खरं म्हणजे सोलापूरमध्ये बरच काही आहे, हे शहर सुधारत आहे. औद्योगिक दृष्ट्या विस्तारत आहे. पण सोलापूरकरांना सोलापूर विषयी नकारात्मक बोलण्याची फार सवय आहे.तेव्हा अशा लोकांनी सोलापुरात चांगलं काय आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि नकारात्मक बोलणं बंद केलं पाहिजे, असे प्रतिपादन अनिश सहस्त्रबुद्धे यांनी सोलापूर ब्रँडिंग व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना केले.

मी सोलापूरचा सोलापूर माझे हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. या ऑनलाईन व्याख्यानाला सोलापूरकर श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.अनिश सहस्त्रबुद्धे यांनी सोलापूर शहरांमध्ये असलेले उद्योग हे जगात किती प्रसिद्ध आहेत याची माहिती दिली.

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये सगळ्या जगाला सप्लाय करणाऱ्या काही चांगल्या कंपन्या आहेत. यातल्या काही कंपन्यांकडे महाराष्ट्रातलले अनेक उद्योजक मार्गदर्शक म्हणून आणि आदर्श म्हणून पाहतात परंतु सोलापूरच्या लोकांनाच त्याची जाणीव नाही. आणि हे सोलापूरकर लोक सातत्याने नकारार्थी बोलत राहतात. असं ते म्हणाले.

सोलापूरचे प्रदूषण कमी आहे. चेन्नई मुंबई पुणे बंगलोर हैदराबाद या 5 माहिती तंत्रज्ञान केंद्रांच्या मध्यवर्ती भागी सोलापूर आहे आणि एका रात्रीतल्या प्रवासाने या शहरापर्यंत सोलापूर हुन जाता येते ही सोलापूरची जमेची बाजू आहे असे त्यांनी नमूद केले.

आपण महाराष्ट्रातल्या काही शहरांच्या तुलनेत पाहिले तर सोलापूरचा गुन्हेगारीचा आलेख बराच खाली आहे हे आपल्या लक्षात येईल . ही गोष्ट सुद्धा सोलापूरच्या विकासाला उपयुक्त ठरू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!