---Advertisement---

सोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न – नाना पटोले

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षाचे हंगामी अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्या नंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी १२ फेब्रुवारी २०२० रोजीच कोरोना त्सुनामी सारखे संकट असल्याचा इशारा दिला होता. परंतु मोदींपासून देवेंद्र फडणवीसापर्यंत भाजप नेत्यांनी आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही असे म्हणत दुर्लक्ष केले.याला सर्वस्वी केंद्रातील भाजप सरकारचा अहंकार आणि भोंगळपणा जबाबदार आहे. कोरोना संकट हाताळण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.असे नाना पटोले यांनी म्हंटले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून देशाचे स्मशान बनविणा-या नरेंद्र मोदींच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्याचे धाडस दाखवावे, असे घणाघाती उत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!