---Advertisement---

कोरोना संकटात १ हजार कुटुंबासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आले धावून !

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२६ : कोरोनाच्या लाटेमुळे लोकांचे प्राण वाचविण्यासाठी शासनास कडक लॉकडाऊन करावे लागत आहे. त्यामुळे छोटे छोटे व्यवसाय करून जगणाऱ्या कित्येक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरातील गरजू लोकांसाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे गेल्या ३९ दिवसांपासून रोज अन्नदान करण्यात येत आहे.तसेच अक्कलकोट कोविड केअर सेंटर येथे गेल्या २६ दिवसांपासून रुग्णांना सकाळचा अल्पोउपहार देण्यात येत आहे. पण जिथे तयार अन्न पोहोचवू शकत नाही अशा ठिकाणच्या गरजू लोकांसाठी ज्यांचे व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांच्या
चुली बंद पडल्या आहेत.

अशा गरजू १ हजार कुटुंबासाठी किमान
१५ ते २० दिवस पुरेल असे गव्हाचे पीठ,तांदूळ , तुरडाळ, तेल, रवा,पोहे, साखर चहापत्ती आदी अन्नधान्याचे किट वाटप करण्यात येणार आहे.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले आणि प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरु आहे.

तरी गरजू लोकांनी खालील क्रमांकावर संपर्क करावा,आम्ही त्यांना त्यांच्या
घरापर्यंत वरील किट पोहोचवू. त्यासाठी
संपर्क-02181-221444(कार्यालय), 9028497851 या नंबरवरती संपर्क करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!