---Advertisement---

शेतकऱ्यांच्या कष्टाला दाम देण्यासाठी जयहिंद कटिबद्ध – माने – देशमुख,जयहिंद शुगर्सचा बाॅयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.११ : अर्थव्यवस्थेच्या सुयोग्य वाटचालीसाठी सर्वाधिक जबाबदार घटक म्हणून बळीराजांकडे पाहिले जाते.म्हणून त्यांच्या घामाच्या प्रत्येक थेंबाला दाम देण्यासाठी जयहिंद परिवार कटिबद्ध आहे,असे प्रतिपादन जयहिंद शुगर्सचे मार्गदर्शक बब्रुवान माने – देशमुख यांनी केले.

आचेगांव (ता. दक्षिण सोलापूर) येथील जय हिंद शुगर्सच्या बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर विक्रमसिंह पाटील, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, शेती अधिकारी राजेंद्र जेऊरे ,कमल कनन,अमोल जगताप, राहुल घोगरे, शिवकुमार पाटील, प्रकाश बिगडे, गोरक्षनाथ पवार, राजा चव्हाण, व्यंकट मोरे, प्यारन मुल्ला,सचिन गुंड आदी उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाच्या सुरूवातीला जकापूरचे सरपंच संतोष आळगे व ढोक बाभूळगावचे नंदकुमार व्हनगर दांम्पत्याच्या हस्ते होमहवन व सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली. यानंतर बाॅयलर अग्नीप्रदीपन सोहळा पार पडला.

पुढे बोलताना माने – देशमुख म्हणाले की, जयहिंद शुगर्सने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे.दुष्काळ निवारणासाठी जलसंधारणाची कामे,कारखाना स्थळावर गोशाळेची निर्मीती यासोबतच कारखाना आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ऊसाच्या बिलाचे वाटप केले आहे.आजवर ऊस उत्पादकांनी जयहिंद परिवाराला सहकार्य केले आहे.
यापुढील काळात देखील अशाच सहकार्याची अपेक्षा आहे.कार्यक्रमाला अक्कलकोट, द.सोलापूर तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते. वेदोपचार वेदमुर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ यांनी केले.

११ लाख मेट्रिक टन
गाळपाचे उद्दिष्ट

यावर्षी २३ हजार हेक्टरवरील ऊसाची नोंद जयहिंद कारखान्याकडे झाली आहे.शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने जयहिंद परिवारावर प्रेम केले आहे.त्यांच्या विश्वासाला पात्र राहून कार्य करणार आहोत.११ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करणार असल्याचे चेअरमन गणेश माने – देशमुख यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!