---Advertisement---

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असून राज्यातील लॉकडाऊन हटणार का? याची विचारणा केली जात आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. आज रविवारी रात्री ८.३० वाजता उद्धव ठाकरे सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते कोरोना रुग्णसंख्या, लॉकडाऊन, कोरोना लसीकरणासह विविध विषयांवर चर्चा करणार आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे हे आज रविवार ३० मे २०२१ रोजी रात्री ८.३० वाजता समाज माध्यमांवरून नागरिकांना संबोधित करतील, असे सांगितले आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. यामुळे सरकार लॉकडाऊन उठवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!