---Advertisement---

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त दोनशे गरजू कुटुंबांना धान्य वाटप, अक्कलकोट राष्ट्रवादीने राबविला उपक्रम

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट,दि.११ : वाढत्या कोरोना प्रादुर्भावाने सर्वसामान्याचे जगणे अवघड झाले आहे.तसेच कोरोनामुळे बऱ्याच
जणांचे उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत.यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही सामाजिक जाणीव समजून घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी युवक
काँग्रेसने दोनशे कुटुंबांना धान्य वाटप केले.त्यांना छोटासा आधार देण्याचा प्रयत्न केला.यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन गरजू कुटुंबाची माहिती संकलित केली.

या धान्य वाटपाचा शुभारंभ राष्ट्रवादी जिल्हा निरीक्षक महिला दिपाली पांढरे व तालुकाध्यक्ष दिलीपभाऊ सिद्धे,
तालुका युवक अध्यक्ष शंकर उर्फ बंटी
पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला मैनूदिन कोरबु, प्रभाकर सोमवंशी, सागर शिंदे ,आबा सोमवंशी, श्रीशैल चितली, अविराज सिद्धे ,प्रताप यादव, समर्थ सोमवंशी, सतीश धनके,
प्रतिक पोळ,प्रमोद सोमवंशी उपस्थित
होते.

सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सागर सोमवंशी, आकाश तुवर, राज पाटील, वैभव मोरे, दर्शन साळुंके, गौरव सुतार, समर्थ तूवर ,अभी सोमवंशी, नैतिक जाधव, पवन राऊत यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादीचे तालुका युवक अध्यक्ष शंकर उर्फ बंटी पाटील यांनी केले होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!