---Advertisement---

पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तरुण वर्गापर्यंत काँग्रेसचा विचार पोहचवा – नाना पटोले

Follow Us:
---Advertisement---

जळगाव : पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तरुण वर्गापर्यंत काँग्रेसचा विचार पोहचवा असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक काल सोमवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली गांधी भवन येथे पार पडली. यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना नाना पटोले यांनी संघटन भक्कम करण्यासाठी आवाहन केले.

या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, आमदार शिरीष चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष भाई नगराळे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील उपस्थित होते.

समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाणारा काँग्रेस पक्ष असून जळगाव जिल्हा व उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस संघटना मजबूत करून पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी काम करा, असे आवाहन यावेळी पटोले यांनी केले.

जनता सध्या भाजप सरकारला कंटाळलेली असून जनमत काँग्रेस विचाराकडे मोठ्या संख्येने आकर्षित होत आहे. देशात काँग्रेस हाच भाजपला पर्याय असून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी बूथ स्तरावर काम करा आणि गावखेड्यात काँग्रेसचा विचार पोहचवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!