---Advertisement---

गायक मोहंम्मद अयाज यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

Follow Us:
---Advertisement---

मुंबई, दि.१८ : नुकतेच मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचा महागायक विजेता मोहम्मद अयाज यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी सुनील तटकरे, ग्रहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक,  राज्यमंत्री संजय बनसोडे,  अल्पसंख्यांकचे राष्ट्रीय सचिव मतीन कांबळे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मोहम्मद अयाज गेले अनेक वर्षे झाले संगीत व सामाजिक क्षेत्रामधे काम करत आहेत. सोलापूर व देशाचे नाव जग भरामधे लौकीक केला आहे. त्यांना देश विदेशामधे अनेक पुरस्कारांनी सन्मानीत केले गेले आहे. अयाज सांगतात की, मी पक्षामध्ये राजकारण न करता एक समाजकारण करु इच्छितो, कारण सर्वप्रथम मी एक कलावंत आहे . मला सांस्कृतिक विभागमध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे. पक्ष श्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास ठेऊन जे काही मला संधी दिलेली आहे त्याच सोनं करेन,  कलाकारांचे प्रश्न असो किंवा सामाजिक प्रश्न त्यांना त्यांचे हक्क मिळवुन देण्याचा प्रयत्न करेंन, मी स्वताला खरोखरच भाग्यवान समजतो की एक कलावंताचा पक्ष प्रवेश एवढ्या मोठ्या लेवलवर झाला आणि तेही अनेक मंत्री महोदय उपस्थित होते.

हे सर्व नक्कीच माझ्यावर व माझ्या कलेवर प्रेम दाखवले ही बाब माझ्यासाठीच नव्हे तर सोलापूरसाठी पणमला विश्वास आहे. माझे सर्व सोलापूरकर व महाराष्ट्राचे रसिक गण माझ्या पाठीशी उभे नक्कीच राहतील. आणि मला समाजासाठी काही तरी चांगले काम करण्यासाठी चालना देतील अशी मला खात्री आहे. आज मी एक गायक कलावंत म्हणुन नावारुपास आलो.  त्यात पत्रकार बंधु व संपूर्ण मीडिया ग्रुपचा सिहांचा वाटा आहे. मला व माझ्या कलेस जगभरात पोहोचवणारे पत्रकार बंधुचा सदैव ऋणी आहे, अशी प्रतिक्रिया मोहम्मद अयाज यांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!