ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मराठा आरक्षणासाठी सोलापूरात ४ जुलै उग्र मोर्चा, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची माहिती

सोलापूर : कोल्हापूरातील मूक मोर्चा नंतर  आता सोलापुरात मराठा आरक्षणासाठी येत्या ४ जुलै रोजी उग्र मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी हा मोर्चा काढणारच, असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. राज्यातील हा सर्वात मोठा मोर्चा राहणार असून ४ जुलै रोजी सोलापूरच्या प्रत्येक तालुक्यात रास्ता रोको करण्यात येणार असल्याचंही नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाची माहिती दिली. कोल्हापूरनंतर आता सोलापुरात हा मोर्चा निघणार आहे. केवळ मराठा समाजच नाही तर शेतकरीही या मोर्चात सहभागी होणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होणार आहे.

या मोर्चाची मोर्चेबांधणी करण्यासाठी या आठवड्यात जिल्ह्याचा दौरा सुरु करण्यात येणार आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी सोलापुरातील लोकप्रतिनिधींसह खासदार संभाजी राजे छत्रपती, खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे.

मूक मोर्चा काढून काहीही होत नाही. त्यामुळे उग्र मोर्चा काढणार आहोत. असे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!