पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौैकशी करण्याची मागणी करणारा प्रस्ताव भाजपच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत मंजूर करण्यात आला होता. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिकिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.
चंद्रकांत पाटील हे मोठे कर्तृत्वान गृहस्थ आहेत. यापूर्वी कधी झाल्या नाहीत त्या गोष्टी करण्यात त्यांचा लौकीक आहे त्यांनी पुढाकार घेऊन असं काही केलं तर आश्चर्य नाही. चौकशी यंत्रणा त्यांच्या हातात आहेत, त्यांचं स्वागत आमचे सर्व सहकारी करतील, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने आज सकाळी छापेमारी केली आहे. महिना भरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ईडी वगैरे आम्हाला काही नवीन नाहीत. अनिल देशमुख मे पाहिले नाहीत. अनेकदा सत्तेचा या पद्धतीने वापर करण्याचा पायंडा आत्ताच्या राज्यकर्त्यांनी दाखवला आहे. त्याची आम्हाला कींचीतही चिंता वाटत नसल्याचं शरद पवार म्हणाले.