मुंबई : राज्यात मराठा आरक्षण पाठोपाठ आता ओबीसी आरक्षणचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींना आरक्षण मिळवून दिली नाही तर राजकीय संन्यास घेईन, असे वक्तव्य नागपुरात काल जेलभरो आंदोलन दरम्यान केले होते. यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सचिन सावंत ओबीसी राजकीय आरक्षणावर बोलताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचं पाच वर्षांचा कार्यकाळ ज्यांना माहीत आहे आणि त्यांनी दिलेली आश्वासने माहीत आहेत. ते यावर कुठल्याही प्रकारे विश्वास ठेवत नाहीत. देवेंद्र फडणवीस हे फक्त आश्वासन देतात, मोठ-मोठ्या गप्पा मारतात. पण त्या कधीच पूर्ण करत नाहीत. ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण होणे हे केवळ भाजपाचे पाप आहे अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण होणे हे भाजपाचे पाप आहे. अनेकदा आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या फडणवीस साहेबांच्या बोलण्यावर जनतेचा विश्वास बसणार नाही. pic.twitter.com/GojPoDgTMn
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 27, 2021
पुढे बोलताना सावंत म्हणाले की, सत्ता मिळवण्यासाठी बेफाम आश्वासन द्यायची आणि नंतर त्या आश्वासनांना वाटाण्याच्या अक्षता लावायच्या ही फडणवीसांची कार्यपद्धती आहे. धनगर समाजाच्या मेळाव्यात त्यांना “क्या हुआ तेरा वादा” हे गाणे हे धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी उगाचच ऐकवले नव्हते. म्हणून जनतेचा त्यांच्यावर विश्वास बसणार नाही असे सावंत यांनी म्हंटले आहेत.
दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जींनी नीती आयोगाच्या अध्यक्षांना व @Pankajamunde जींनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून ओबीसींच्या जनगणनेची माहिती मागितली होती. दोन वर्षं भाजपा नेत्यांनी मागणी करुनही केंद्र सरकार ती देत नसेल तर त्यात मविआ सरकारची चूक ती काय? pic.twitter.com/PNUsC4PUYT
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 27, 2021