नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात आगामी काळात लोकसभा निवडणूक येण्यापुर्विच शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत देखील दोन गट पडले असून आता राष्ट्रवादी अजित पवारांची झालेली आहे. यावर शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांकडून विरोधकांवर टीकास्त्र होत आहे. यात आ. जितेंद्र आव्हाड यांनी मोठ वक्तव्य केले आहे.
दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले कि, शरद पवारांना संपवण्यासाठी, मारण्यासाठी, राजकीय हत्या करण्यासाठी मोठा कट रचला जात आहे. दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जर 2019 पासून वाद सुरु झाला तर मग अजित पवार विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री कसे झाले? अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली आहे. तसेच कोणता संजय निवडणूक आयोगाला जाऊन ही विचारणा करत आहे? असेही त्यांनी विचारले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शरद पवारांना संपवण्यासाठी, मारण्यासाठी, राजकीय हत्या करण्यासाठी किती मोठा कट रचला जात आहे हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणण्याची गरज आहे. आम्ही दिलेल्या पर्यायांचा कागदपत्रात साधा उल्लेख केलेला नाही. हे त्यांनीच लिहिले आहे का याबद्दलही शंका आहे. जर निवडणूक आयोगासारखी संस्था जर कायदेशीररित्या चालणार नसेल आणि बेकायदेशीरपणे निर्णय घेणार असेल तर हे धक्कादायक आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, कालचा एकंदरीत जो निर्णय आहे, तो पाहिल्यानंतर काही आश्चर्यकारक गोष्टी समोर येतात. अजित पवार यांची निवड ही चुकीची आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. पण हे सांगताना त्यांनी 2019 ला अजित पवार फुटले तेव्हापासून वाद सुरू झाला असे सांगितले आहे. तेव्हा काकांनी (शरद पवार) मोठे मन दाखवत 2019 ला फुटल्यानंतरही कुशीत घेतले आणि त्यांच्या डोक्यावर हात फिरवत उपमुख्यमंत्री केले. मग यात वाद कुठे होता? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.