अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
सर्व सकल हिंदू समाजाच्यावतीने गुरुवार दि.१ फेब्रुवारी रोजी अक्कलकोट शहर बंदची हाक देण्यात आली आहे.याला विविध संघटनांचा पाठिंबा देखील मिळाला असून हा बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.अक्कलकोट येथे वारंवार होत असलेल्या हिंदु देव देवतांच्या फोटोची विटंबना व हिंदुत्वादी कार्य करणाऱ्यां कार्यकर्त्यांवर होत असलेले वारंवार हल्ले व दि.३० जानेवारी रोजी झालेल्या हिंदु कार्यकर्त्यावरील प्राणघातक हल्लयाच्या निषेधार्थ अक्कलकोट शहर बंदची हाक देण्यात आली आहे.
अक्कलकोट शहर व तालुक्यातील सर्व हिंदु समाजाच्यावतीने ही हाक देण्यात आली आहे.तरी बंदमध्ये सहभागी होऊन आपआपले दुकान,शाळा,महाविद्यालय पुर्णपणे बंद ठेवण्यात यावे.या उपरही जर शहरातील दुकान,शाळा,महाविद्यालय चालु ठेवल्यास होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार असाल,असा इशारा प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर अक्कलकोट व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे यांनी तातडीने शहरातील व्यापाऱ्यांची बैठक घेतली.या बैठकीमध्ये या बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.या बंद काळात एखाद्या व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला,असे साखरे यांनी सांगितले.या बैठकीला अक्कलकोट शहरातील सर्व प्रमुख व्यापारी व पदाधिकारी उपस्थित होते.