---Advertisement---

सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त एम.राजकुमार

By team
On: February 1, 2024 10:25 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या गृह विभागाने बुधवारी सायंकाळी राज्यातील ४४ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदली करण्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले असून, यात सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा समावेश आहे. विद्यमान पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या सहसंचालकपदी बदली झाली असून, त्यांच्या जागी जळगावचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार हे पदोन्नतीने बदलून येत आहेत.

पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांना दीड ते दोन वर्षाचा काळ लाभला. या काळात त्यांनी पोलीस प्रशासनाला शिस्त लावून शहरातील क्राईम रेट कमी करण्याबरोबरच वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचाही प्रयत्न केला. नव्याने सोलापूरला दाखल होणारे जळगावचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार हेही अतिकडक आणि शिस्तीचे मानले जातात.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!