ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जरांगेंवर पाटलांवर नांदेडला ‎गुन्हा दाखल

नांदेड : वृत्तसंस्था

मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्यावर निघाले असतांना मराठा आरक्षणाची पुढील रणनीती‎ ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील सोमवारी‎ दि.४ नांदेडला आले होते. चांदोजी मंगल‎कार्यालयात सोमवारी रात्री ११.३० वाजता त्यांची ‎बैठक झाली.

दरम्यान रात्री १० नंतर ध्वनीक्षेपक‎चालू ठेवणे, जमावबंदीचे उल्लंघन,‎विनापरवानगी सभा घेतल्याने, जरांगे यांच्यासह‎सभेच्या आयोजक श्याम वडजे अशा दोघांवर‎भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.‎यापुर्वी त्यांच्यावर बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल‎ झाला होता.‎ सभेचे आयोजक श्याम वडजे यांनी‎सभेसाठी निवेदन देवून परवानगी मागितली‎ होती. परंतु त्यांना परवानगी देण्यात आली‎ नव्हती. तरी सध्या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी‎ जमावबंदी आदेश लागू केला आहे. या‎आदेशाचे उल्लंघन करुन सभा घेतली. तसेच‎सभेसाठी रात्री १० नंतर ध्वनीक्षेपक चालू‎ठेवले. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल विजय ‎तोडसाम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल‎ झाला.

राजकारण माझा मार्ग नाही मात्र‎ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून‎ ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेतल्याशिवाय‎गप्प बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे‎पाटील यांनी सभेतून दिला. या वेळी त्यांनी‎फडणवीस यांच्यावर टीका केली.

पुढे बोलताना‎ जरांगे म्हणाले, जनतेने फडणवीसांना गृहमंत्री‎पदाच्या गादीवर बसवले. मात्र ते जाणूनबुजून‎दहशत निर्माण करत असतील तर आम्ही आता‎सहन करणार नाही, असे जरांगे म्हणाले.‎ शासनाने सगेसोयऱ्यांची अधिसूचना‎काढली. जाणूनबुजून एखाद्या‎मंत्र्याच्या दबावामुळे कायदा होत‎नाही. मात्र सगेसोयऱ्यांची‎अंमलबजावणी करण्याशिवाय‎सरकारकडे दुसरा पर्याय नाही. १०‎टक्के आरक्षणाचा सरकारने डाव‎टाकला. हा डाव उधळून लावू, असे‎जरांगे म्हणाले.‎

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!