ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रात्रीच्या सुमारास डंपरची बसला धडक : १२ प्रवासी जिवंत जळाले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

नुकतेच वर्ष अखेरीच्या दोन दिवसापूर्वी मध्य प्रदेशात एक भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. रात्री ९ वाजेच्या सुमारास डंपर आणि बसमध्ये जोरदार धडक झाली. त्यानंतर बसमध्ये आग लागली. बसमधील 12 प्रवासी जिवंत जळाले. या प्रवाशांना रुग्णालयात नेताना आणि रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. काळाजाचा थरकार उडवणारा हा भीषण अपघात आहे.

15 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. बसमध्ये जवळपास 40 प्रवासी होते. पोलीस घटनास्थळी पोहोचले. आसपासच्या लोकांनी बचावकार्यात मदत केली. घटनास्थळी पोलीस असून फायर ब्रिगेडकडून जोरात बचावकार्य सुरु आहे. मध्य प्रदेशातील गुना येथे हा भीषण अपघात झाला.

गुनाचे एसपी विजय कुमार खत्री यांनी सांगितलं की, “या भीषण अपघातात होरपळलेल्या 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 14 प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय” अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाने बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. यात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला. 12 पेक्षा जास्त प्रवासी आगीमध्ये होरपळले आहेत. त्यांना 6 पेक्षा जास्त रुग्णवाहिकांमधून हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलं. बजरंगगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोहाई मंदिराजवळ हा अपघात झाला. बसच अनफिट होती, हे सुद्धा अपघातामागच एक कारण आहे. म्हणजे बसची स्थिती खूपच खराब होती. पण तरीही प्रवासी वाहतुकीसाठी वापर सुरु होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!